| आता एकदा बाप्पा माझं ऐकून तरी बघ |
| दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ |
| लोकांचे ओंगळवाणे धुताना पाप |
| माहित आहे मला, तुला होतो खूप ताप |
| विजेचा टाहो जोरा फोडून तरी बघ |
| दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ |
| धुसफूस करून काय मिळे सांग रे तुला ? |
| मनालाच खुपतील सगळ्याच सला |
| आता तरी धाय जरा मोकलून बघ |
| दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ |
| तुझ्या पायावरी डोके ठेवूनिया भारे |
| रचलेले आहेत आम्ही पापाचे ढिगारे |
| पाय धुण्यासाठी देवा बरसून तरी बघ |
| दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ |
| तू मोकळा होताना पाऊस झरेल |
| माय माझी हिरवीगार होता बहरेल |
| आनंदाची दोन टिपे गाळून तरी बघ |
| दाटलेलं मळभ जरा ढाळून तरी बघ |
| .....................................................अभिनव |
सोमवार, ९ जुलै, २०१२
पावसासाठी बाप्पाची समजावणी ........
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा